लावूनिया नेत्र सदा स
3635.
लावूनिया नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं ॥१॥
नाही देहावरी रुपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामें ॥२॥
अज्ञान ते बाळ धरित ते पाया । चित्त देवराया समरसलें ॥३॥
एका जनार्दनी नाचतां समरसे । बाळ पायांसरसें चिखलीं आले ॥४॥
