येवोनियां जवळीं बोभा
3637.
येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली ॥१॥
ठेवूनिया बाळ जीवनालागीं गेले । तुम्ही काय केले बाळ माझे ॥२॥
परि तो समाधिस्थ नायकेचि बोल । वाचे गाय विठ्ठल प्रेमभरित ॥३॥
नाचे आनंदानें गाय नामावळी । एका जनार्दनी बोली कोण मानी ॥४॥
