बैसला तो ध्यानी मनी
815.
बैसला तो ध्यानी मनी ।
पाहता लोचनी विठ्ठल ॥१॥
रुप गोजिरे सुंदर ।
वेधिले अंतर मन बुध्दी ॥२॥
नाठवेचि काही आता ।
त्याविण चित्ता दुसरे ॥३॥
निळा म्हणे लाविले पिसे ।
मी मज नुमसे आठविता ॥४॥
815.
बैसला तो ध्यानी मनी ।
पाहता लोचनी विठ्ठल ॥१॥
रुप गोजिरे सुंदर ।
वेधिले अंतर मन बुध्दी ॥२॥
नाठवेचि काही आता ।
त्याविण चित्ता दुसरे ॥३॥
निळा म्हणे लाविले पिसे ।
मी मज नुमसे आठविता ॥४॥