आले हो संसारा तुम्ही
4028.
आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तीमारग हळूचि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । का रे अघोरा दचकसी ना ॥१॥
नाही त्या यमासि करुणा । बाहेर काढिता कुडी प्राणा । ओढाळ सापडे जैसे धान्या । चोर यातना धरिजेतो ॥२॥
नाही दिले पावइल कैसा । चालता पंथे तेणे वळसा । नसेल ठाउके ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनिया ॥३॥
क्षण एक नागीवा पायी । न चलवे तया करिता काही । ओढिती कांटवणा सोई । अग्निस्तंभ बाही कवटाळविती ॥४॥
देखोनि अंगे कापती । तये नदीमाजी चालविती । लागे ठाव ना न चलवे बुडविती । वरी मारिती यमदंड ॥५॥
तहानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमी ज्वाळ लोळविती ॥६॥
म्हणउनी करा काही सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तीरस तुका म्हणे ॥७॥
अर्थ :
अहो तुम्ही या संसारामध्ये आला आहात म्हणजे मनुष्य देहात आला आहात तरी एक काम करा हळूच मुक्तिमार्ग धरा. अरे तू जर मुक्तिमार्ग धरला नाही तर काळ तुला कुंभीपाक नरकाच्या मोठया यातनाचा दंड करीन व हे तुला कळले असून तरी देखील हे अघोरा तू घाबरत का नाहीस ? देहातून प्राण बाहेर काढताना त्या यमाला कसलीही करुणा येत नाही. ओढाळ जनावर जर धान्य खाताना मालकाला सापडले तर त्याची गय होत नाही आणि चोर चोरी करताना सापडला तर त्याला अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात अरे तू जर पूर्वजन्मात काही पुण्याचे दान केले नसेल तर ते तुला या जन्मात कसे प्राप्त होईल ? अरे पापाच्या मार्गाने चालताना मोठा वळसा भोगावा लागतो तो जर तुला माहित नसेल तर मी तुला सांगतो ते तू ऐक जसे बंदीखान्यातील कैदयाला धरु
