वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

विठ्ठल रुक्मिणी राही

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084404 · अभंग क्र. ४८९

489.
विठ्ठल रुक्मिणी राहीं सत्यभामा एकरुपी परमात्मा पंढरीये ॥१॥
कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपें पुंडलिकासे वश्य जाहिलें ॥२॥
अणूरेणुपासोनि भरुनि उरला । तो म्या देखियेला पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी सांवळा श्रीकृष्ण । जनी जनार्दनी पुर्ण भरला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग