ऐशी आवडी मीनली सुखा
488.
ऐशी आवडी मीनली सुखा । देव उभा भक्तद्वारीं देखा ॥१॥
धन्य धन्य पुंडलीका । उभे केले वैकुंठनायका ॥२॥
युगें अठ्ठावीस नीत । उभा विते कर धारुनियां कट ॥३॥
एका जनार्दनी शरण जाऊ । काया वाचा मने त्यासी ध्याऊं ॥४॥