एक गांऊ आम्ही विठोबा
1006.
एक गांऊ आम्ही विठोबाचे नाम ।
सकळहि धाम मंगळाचे ॥१॥
इतर साधने फळ काम देती ।
पुनरपी आणिती गर्भवसा ॥२॥
योग याग स्वर्ग काम फळदाते ।
म्हणोनिया त्याते दूषिती संत ॥३॥
निळा म्हणे नाही विकार हरिनामा ।
पाववी निजधामा स्वस्ति क्षेम ॥४॥
