(निर्याणाचे अभंग)
3627.
(निर्याणाचे अभंग)
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥
वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळी विठो आम्हासी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥३॥
अर्थ :
आता आम्ही वैकुंठाला जात आहोत आमच्यावर सर्वांची कृपा असू दयावी सर्वांना माझी हीच विनंती सांगावी. खूप वेळ झाला आहे पाडूरंग उभा आहे तो श्रीरंग मला वैकुंठाला बोलावित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अंत:काळी प्राणाच्या वेळी विठोबा मला पावला आणि मी कुडीसहीत म्हणजे माझ्या देहासहीत गुप्त झालो आहे.
