(निर्याणाचे अभंग)
3628.
(निर्याणाचे अभंग)
न देखिजे ऐसे केले । या विठ्ठले दुःखासी ॥१॥
कृपेचिये सिंहासनी । अधिष्ठानी बैसविले ॥धृपद॥
वाजता तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनी ॥२॥
तुका म्हणे अवघे ठायी । मज पायी राखिले ॥३॥
अर्थ :
विठ्ठलाने मला पुन्हा दु:ख दिसणार नाही असे केले आहे. विठोबाने माझ्यावर कृपा केली आणि जगाचे अधिष्ठान असलेल्या ब्रम्हरुप सिंहासनावर मला बसविले आहे. क्षीरसागरामध्ये शय्येवर बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दु:खाचा वारा लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाने मला सर्वत्र व्यापक केले आहे आणि त्याच्या पायाच्या ठिकाणी मला आश्रय दिला आहे.
