वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

आला द्वारावती पाहिली

🙏 4. संत नामदेव · ABH-081833 · अभंग क्र. ८९०

890.
आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति | जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची ॥१॥
धरी मच्छावतार केला शंखोद्धार | देव मुक्तीमाहेर पांथिकांचे ॥२॥
तेथोनि सत्वर आला पिंडारका | मंगळहडीहुनी द्वारका देखियली ॥३॥
सुवर्णाची नगरी ब्राह्मणा दिधली | ते पुरी पाहिली सुदामयाची ॥४॥
मंडपाकार शोभे तो माधव | रुक्मिणी विवाहो जाला जेथे ॥५॥
संपादुनी गेला अवतारकृत्य | ते भालुकातीर्थ देखियेले ॥६॥
पश्चिमे प्रभासलिंग देखियेले | सोरटी वंदिले सोमनाथा ॥७॥
मुचुकुंदाचि गुंफा काळयवन उभा | विश्रांति पद्मनाभा धवलपुरी ॥८॥
मार्गीची तीर्थे करुनी समस्ते | आला शक्ति जेथे सप्तशृंगा ॥९॥
अरुणा वरुणा प्राची गोदावरी | ते कपाळेश्वरी पूजा केली ॥१०॥
पुढे ज्योतिर्लिंग देखिले त्र्यंबक | कुशावर्ती उदक स्वीकारिले ॥११॥
वंदूनिया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरी | मग भीमाशंकरी आनंदाला ॥१२॥
देखोनिया भीमा आठवे पंढरी | विठ्ठला अंतरी पांडुरंग ॥१३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग