पतित पावन ह्मणविसी आ
23.
पतित पावन ह्मणविसी आधी ।
तरी का उपाधि भक्तांमागे ।।१।।
तुझे म्हणविता दुर्जे अगसंग ।
उणेपणा सांग कोणाकडे ।।२।।
सिंव्हाचे भातुके जंबुक पे नेता ।
थोराचिया माथा लाज वाटे ।।३।।
ह्मणे कान्होपात्रा देह समर्पण करवा ।
जतन ब्रिदासाठी ॥४॥
