वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

बेटाऊद तापी-तीरी तेथ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076074 · अभंग क्र. १५८

158.
बेटाऊद तापी-तीरी तेथे वेश्य ।
सांभवाचा दास केदार होता ॥१॥
त्यासी नाही कन्येचे संतान ।
केले अनुष्ठान महाउग्र ॥२॥
शंकर प्रसन्न करूनिया तेणे ।
स्वप्नगत येणे जाले हरा ॥३॥
पुत्र नाही तुज होईल संतान ।
एक कन्या जाण रूपवती ॥४॥
वारूणी हे नाम ठेवावे तियेसी ।
वाचेल सायासी वर्षे तेरा ॥५॥
केदार वैश्यासी रूपवंती नाम ।
स्त्रिया ते उत्तम पतिव्रता ॥६॥
पतीचे वचन तियेसी प्रमाण ।
शांभवी ते जाण दीक्षा तिची ॥७॥
रूपवंती गर्भ धरी तिये वेळा ।
जन्म मज दिला महारूद्रे ॥८॥
पूर्वील संस्कार होता काही शुद्ध ।
जन्मता प्रसिद्ध कळो आला ॥९॥
जन्मलिया मज वर्षाचिया पोटी ।
पहाताची दृष्टी वदन माझे ॥१०॥
’आणिला सद्गुरू केदारे आपुला ।
तयाते दाविला भाव माझा ॥११॥
नाही लग्न करू दिधले आपण ।
माझा सहज गुण वोळखिला ॥१२॥
दिधली ते दीक्षा शंकराचा मंत्र ।
जपे अहोरात्र खेळताही ॥१३॥
खेळता देऊळी शंकराची मूर्ती ।
करीतसे भक्ति प्रेमरसे ॥१४॥
नावडेची काही आणिक सर्वथा ।
अखंडता चित्ता लागलीसे ॥१५॥
ऐसी तेरा वरूषे होताची संपूर्ण ।
जाले ते दर्शन तुझे येथे ॥१६॥
सद्गुरू आमुचा तेथे तू सेवक ।
जैसे एक रंग पोटासाठी ॥१७॥
माझे मुखे पुत्र घेतले रे तुज ।
अंत हा रे मज जाला तेव्हा ॥१८॥
तयापुढे दुसरा जन्म म्या घेतला ।
ऐक बा वहिला एकचित्ते ॥१९॥
बहेणि म्हणे पहिल्या जन्मांचे हे मूळ ।
आणिक केवळ सांगतसे ॥२०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग