वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आणिक सांगेन पूर्वील

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076039 · अभंग क्र. १५९

159.
आणिक सांगेन पूर्वील वृत्तांत ।
सावधान चित्त असो तुझे ॥१॥
तीन जन्म माझे वैश्याचे कुळी ।
साधनाच्या भेळी भोगियेले ॥२॥
एक जन्म तुज सांगितला आता ।
पुढिली वेवस्था सांगेन ते ॥३॥
‘ कुमचक्र’ ग्राम फल्गूचिये तीरी ।
सात्त्विकाच्या घरी जन्म आम्हा ॥४॥
स्वधर्मी तो वैश्य शंकराचा भक्त ।
अत्यंत विरक्त आत्मवेत्ता ॥५॥
तयाचा सद्गुरू सुवर्मा ब्राह्मण ।
आगमीचे पूर्ण ज्ञान तया ॥६॥
मंत्रविद्येमाजी असोनि प्रवीण ।
आत्मज्ञानी पूर्ण हेत तया ॥७॥
तयाचा तू शिष्य सात्त्विक हा भोळा ।
पुत्र ते तयाला सात होते ॥८॥
कन्येसाठी थोर उद्विग्न मानसी ।
सद्गुरूने त्यासी सांगितले ॥९॥
अनुष्ठानविधी मंत्र उपासना ।
सांगेन ते धारणा वैष्णवीची ॥१०॥
तये वेळी स्वप्न होउनी तात्काळ ।
कन्या ते सुशील सदैव घेई ॥११॥
तिच्या हाते तुज सापडेल धन ।
न करूनी लग्न जाईल ते ॥१२॥
अठ्ठावीस वर्षे क्रमील तुजपाशी ।
आगर भक्तीसी करूनिया ॥१३॥
मग तेथे जन्म घेतला आपण ।
तुझा संग जाण तेथे होता ॥१४॥
गुरूबंधू मज तेथे जोडलासी ।
सहवासे अससी निरंतर ॥१५॥
बहेणि म्हणे ऐसा जन्म हा दुसरा ।
आणिक तिसरा पुढे सांगू ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग