तळमळ निराकारी ।
467.
तळमळ निराकारी ।
जाली माया तेचि खरी ॥१॥
हा तो अनुभव संतांचा ।
पाहे ग्रंथी आहे साचा ॥२॥
रूपी वेद जाला मुका ।
इतरांचा कोण लेखा ॥३॥
नाही शब्दाचे ते काम ।
पाहा शेषे केला श्रम ॥४॥
बहेणि म्हणे शय्या जाला ।
तेव्हा अंगीकार केला ॥५॥
