हाचि पुराणी विचार ।
468.
हाचि पुराणी विचार ।
केला बुद्धी करी स्थिर ॥१॥
करी गुरू उपदेश ।
तेथे मौन्येची प्रवेश ॥२॥
शब्दमाया नाही भिन्न ।
श्रुती सांगितली खूण ॥३॥
शब्द नव्हे रामराम ।
पार्वतीला सांगे शिव ॥४॥
बहेणि म्हणे ब्रह्मरस ।
सेवी का रे सावकाश ॥५॥
