वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080641 · अभंग क्र. ३४३५

3435.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
शिकविले तुम्ही ते राहे तोवरी । मज आणि हरी वियोग तो ॥१॥
प्रसंगी या नाही देहाची भावना । तेथे या वचना कोण मानी ॥२॥
तुका म्हणे चित्ती बैसला अनंत । दिसो नेदी नित्य अनित्य ते ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)हे जनहो जोपर्यंत माझा आणि हरीचा वियोग होता तोपर्यंत तुम्ही शिकवलेले माझ्या मनात राहात होते. एकदा की माझा देह हरीशी एकरुप झाला आणि तो प्रसंग ज्यावेळी येईल त्यावेळी तुमच्या शब्दाला कोण मान देईल ? तुकाराम महाराज म्हणतात, अनंत माझ्या चित्तामध्ये वसलेला आहे तो मला नित्य व अनित्य काहीही दिसू देत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग