(व्यभिचारिणी स्त्रीच
3434.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
मजसवे आता येऊ नका कोणी । सासुरवासिनी बाइयांनो ॥१॥
न साहवे तुम्हा या जनाची कूट । बोलती वाईट ओखटे ते ॥२॥
तुका म्हणे झालो उदास मोकळ्या । विचरो गोवळ्यासवे आम्ही ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)संसारामध्ये रममाण असलेल्या बयांनो माझ्याबरोबर आता कोणीही येऊ नका. कारण मी परपुरुष असा जो हरी आहे त्याच्याकडे चालले आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर आलात तर संसारातील लोक तुम्हाला वाईट उखटे शब्द बोलतील जे तुम्हाला सहन होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसाराविषयी प्रपंचाविषयी उदास व मोकळया झालो आहोत त्यामुळे गोपाळाबरोबर आम्ही क्रीडा करत आहोत.
