वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

एक गोक्षीर धाम धवळा

🙏 4. संत नामदेव · ABH-083729 · अभंग क्र. ४८०

480.
एक गोक्षीर धाम धवळा | एक तो सहज मेघ सांवळा |एक कंठी रुंडमाळा | एक गळा वैजयंती ॥१॥
एक तो वृषभारुढ जाण | एका साजे गरुडवाहन |एक स्मशानी भस्मोद् धुळण | एका शयन क्षीर सागरी ॥२॥
एक भोळा कैलासी चक्रवर्ती | एक तो वैकुंठाधिपती |एका सुरवर मुगुटी वंदिती | एका अंगुष्टी गंगा वाहे ॥३॥
एकाचे चरणी नेपुरे झणात्कारू | एका पायी रूळे तोडरू|एका परिधान व्याघ्रांबरू | एका पीतांबरू कसियेला ॥४॥
एक नरकपाल खट्वांग डमरू त्रिशूळ | एका शंख चक्र गदा कमळ |एका अर्धांगी हैमवती बाळ | एका कमळा वामभागी ॥५॥
एक त्रिपुर संघानी लक्ष न चुके | एकबाणे वाळी वाढीला कौतुके |विष्णुदास नामा एक रूप देखे | हरिहर कौतुके वर्णितसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग