वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

विठ्ठल माउली कृपेचि

🙏 4. संत नामदेव · ABH-083765 · अभंग क्र. ४७९

479.
विठ्ठल माउली कृपेचि सावली | आळविता घाली प्रेम पान्हा ॥१॥
न सांगता सर्व जाणे तान्ह भूक | जवळी व्यापक न विसंबे ॥२॥
माया मोह कैसा झकवि सर्वथा | अंतरीची व्यथा तोचि जाणे ॥३॥
सुखशांति रुपे लेवउनि अंगी | लागो नेदी धगी संसाराची ॥४॥
देऊनि अभयदान करे तो कुरवाळी | करितसे सांवली पितांबरे ॥५॥
मुखी नाममाळा कीर्तन श्रवणी | लेवविली लेणी नवविध ॥६॥
नयनी अंजन सुदले सावळे | समाधान जाले सर्व अंग ॥७॥
अच्युत अनंत सुर्वणाची पेटी | घातलिसे कंठी निर्विकार ॥८॥
चतुर्भुज शोभा रूप मध्ये मणि | प्रभा त्रिभुवनी विराजित ॥९॥
मुक्तलग शुद्ध बिंदुली गोजिरी | पद्महस्त शिरी स्थापितसे ॥१०॥
संत पायरज कपाळी टिळका | नाही भय शंका कळिकाळा ॥११॥
सगुण साजिरा कटी कडदोरा | आवरण दुर्भरा दृढ बोधू ॥१२॥
काम क्रोधादिक करुनि पुतळे | पाई जे घातले पायवट ॥१३॥
वासनेचि दृष्टी लागेल त्या झणी | उभा चक्रपाणि मागे पुढे ॥१४॥
संतपायी नामा शृंगार मंडितु | अखंड क्रीडतु महाद्वारी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग