केले सुखी फार ।
1015.
केले सुखी फार ।
काही न करिता विचार ॥१॥
कोण याती कैसे कुळ ।
नामे आळविता कृपाळ ॥२॥
केले वरिष्ठ सकळा ।
प्रेमे देऊनिया गळा ॥३॥
निळा म्हणे वाढविले ।
वैकुंठी ते सरते केले ॥४॥
1015.
केले सुखी फार ।
काही न करिता विचार ॥१॥
कोण याती कैसे कुळ ।
नामे आळविता कृपाळ ॥२॥
केले वरिष्ठ सकळा ।
प्रेमे देऊनिया गळा ॥३॥
निळा म्हणे वाढविले ।
वैकुंठी ते सरते केले ॥४॥