जन्म जरा तुटती रोग ।
1016.
जन्म जरा तुटती रोग ।
धरिता अनुराग हरिनामींची ॥१॥
ऐसा अनुभव सांगती संत ।
पावले प्रतीत आंगेचि ते ॥२॥
तरोनि आपण आणिका तारिती ।
जड जीवा दाविती मार्ग सोपा ॥३॥
निळा म्हणे नाम वरिष्ठ साधना ।
माजी त्रिभुवना आख्या याची ॥४॥
1016.
जन्म जरा तुटती रोग ।
धरिता अनुराग हरिनामींची ॥१॥
ऐसा अनुभव सांगती संत ।
पावले प्रतीत आंगेचि ते ॥२॥
तरोनि आपण आणिका तारिती ।
जड जीवा दाविती मार्ग सोपा ॥३॥
निळा म्हणे नाम वरिष्ठ साधना ।
माजी त्रिभुवना आख्या याची ॥४॥