केला प्रतिपक्ष आपुल्
1014.
केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमाने ।
तोडिली बंधने बहुतांची ॥१॥
जिही उच्चारिले अनुतापे नाम ।
त्यांचे जन्ममरण निवारिले ॥२॥
कोणीये यातीचा हो का कोणी ।
एका केले कवतुक त्याचे तुम्ही ॥३॥
निळा म्हणे सजना जातीचा कसाई ।
रंका बंका तोही उध्दरिला ॥४॥
