वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

नामपर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089218 · अभंग क्र. १०००

1000.
नामपर

अखंड भूतदया मानसी ।
वाचे नाम अहर्निशी ।
तया न बिसबे हषिकेशी ।
मागे मागे हिंडतसे ॥१॥
जिही परकारणी वेचिले ।
शरीर आयुष्य आपुले ।
धन वित्तही वंचिले ।
तया विठठले सन्मानिजे ॥२॥
जिही गाईले नित्य नाम ।
अंतरी धरुनिया प्रेम ।
तया वस्तिसी निजधाम ।
निर्मूनिया ठेविले ॥३॥
जिही धरिला संतसंग ।
दुराविले त्रिविध जग ।
तया सखा पांडुरंग ।
निजानुभवे जोडला ॥४॥
निळा म्हणे सद्गुरु भक्ति ।
दास्य ब्राम्हणांचे अनुरक्ती ।
तयालागी हा श्रीपती ।
करी सांगाती आपुला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग