वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १०. आळंदीची व पंढरीची तुलना

उभारिला ध्वज तिही लो

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089180 · अभंग क्र. ४७२

472.
उभारिला ध्वज तिही लोकांवरी ।
ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥
ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान ।
मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥
धरुनि सगुण रुपे केली क्रीडा ।
बोलविला रेडा निगम वावे ॥३॥
बैसूनिया वरी चालविली भिंती ।
चांगदेवा प्रती दिली भेटी ॥४॥
मग वास केला अळंकापुरासी ।
पिंपळ व्दारासी कनकाचा ॥५॥
निळा म्हणे ज्याच्या नामे करिता घोष ।
नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग