स्वर्ग मृत्यु पाताळ
999.
स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्ही ताळे उदर |विराटले थोर विश्वरूप ॥१॥
समाधिसंजीवन निव्रुत्ती फावले |ते निधान देखिले आम्ही तुम्ही ॥२॥
निव्रुत्ती सोपान ज्ञानदेव निधी | मुक्ताई सिध्दि आळंकापुरी ॥३॥
पंढरी प्रत्यक्ष केली ज्ञानदेवे | उभारूनि बाहे संग आम्हा ॥४॥
कळिकाळासी त्रास विठ्ठल उच्चारी | हरी चराचरी भरला असे ॥५॥
सर्वत्र सबाह्य अंतरंग रुपडे | ते रुप फाडोवाडे पारखिले ॥६॥
चिंतामणीचे सार कल्पतरू उघड | दावुनिया मूढ तारियेले ॥७॥
सुवर्णाचा पिंपळ तिही केला ठाऊका |त्या समीप देखा कल्पतरू ॥८॥
सिद्धेश्वरलिंग सिद्धिबुद्धि दाता | जड जीवा मुक्तता देतु हरी ॥९॥
ऐसिये स्थानकी ज्ञानदेव राहिले |राहुनी तारिले मूढजन ॥१०॥
नामा म्हणे ज्ञानदेव हा दातार |जडजीवा उद्धार विठ्ठल हरी ॥११॥
