वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

तंव निजभुवनी सुखे पं

🙏 4. संत नामदेव · ABH-081587 · अभंग क्र. ९३२

932.
तंव निजभुवनी सुखे पंढरीनाथ | नित्य जीवी आर्त निजभक्तांचे ॥१॥
कृपेचा वोरसु होता देवापोटी | तेचि करी गोष्टी रुक्माईसी ॥२॥
क्षेम माझा नामा यावा एक वेळा | मग मी जीवावेगळा जाऊ नेदी ॥३॥
आजि माझा डावा का लवतो लोचन | करितसे स्फुरण वामबाहू ॥४॥
उद्वेग उपसर्ग वाटती जीवाशी | कवणा जिवलगाशी कष्ट होती ॥५॥
वाजता पै वारा न लागावा राजसा | माझ्या विष्णुदासा भाविकासी ॥६॥
वाटे तानभूक जाली त्या पीडणी | तरीच माझ्या मनी ऐशी दशा ॥७॥
तंव ती विश्वमाता विचारी नावेक | अवचिता शोक पडिला कानी ॥८॥
म्हणे तृषाक्रांत नामा करीतसे धावा | वेगी जाऊनि देवा सांभाळावे ॥९॥
तंव तो आर्तबंधु ऐकोनि वचन | मनाचेनि मने वेगू केला ॥१०॥
तंव गडगडित कूप उदके वोसंडला | कल्पांती खवळला सिंधु जैसा ॥११॥
ज्ञानदेव म्हणे जाले अभिन्नव | कैसा ऋणिया देव केला येणे ॥१२॥
सावध करोनिया दिले आलिंगन | जीवे निंबलोण उतरिले ॥१३॥
तो येरे चरणावरी ठेवियेला माथा | म्हणे माझी आहे चिंता विठोबासी ॥१४॥
नामा म्हणे माझे बहु लळे पुरविले | कै देखेन पाउले विटेवरी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग