वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

मग लावूनिया नेत्र नि

🙏 4. संत नामदेव · ABH-081586 · अभंग क्र. ९३१

931.
मग लावूनिया नेत्र निर्धारु पै केला | हृदयी आठविला केशीराज ॥1॥
तू इष्ट मित्र बंधु सोयरा जननी जनकु | नेणे मी आणिकु तुजवांचोनी ॥2॥
येई पंढरीराया मजलागी धावतु | झणी पाहासी अंतू कृपाळुवा ॥3॥
तुझिये भेटीची बहु खंती वाटली | आसुवे दाटली नेत्रकमळी ॥4॥
धीर न धरवे जीवा पोकारितो धावा | ये माझ्या केशवा मायबापा॥5॥
कायावाचामने विनटलो चरणासी | तो मी शरण आणिकांसी जाऊ कोणा ॥6॥
जन्मोनी पोसणा तुझाची म्हणती | मोकलिता अंती लाज कोणा॥7॥
अनाथा कैवारी नामाची आयणी | वर्णीजे पुराणी कीर्ती तुझी ॥8॥
ते काय लटकी वाणी करशील आजी | अजुनी तुज माझी करुणा न ये ॥9॥
गजेंद्राकारणे ज्या वेगी धावणे | केले तंव स्मरणे कळवळोनी ॥10॥
द्रौपदीचे आकांती येसी सोडविणे | ते मज कारणे विसरलासी ॥11॥
येता निरविले ज्ञानदेवाप्रति | दिधला त्याचे हाती हात माझा ॥12॥
तो तू कैसा मजलागी करशील उदास | धाव कासावीस थोर जालो ॥13॥
सर्वभावे तू मजलागी लोभापर | मी तुझा डिंगर आवडता ॥14॥
नामा म्हणे हांसे जाले पिसुणाचे | न करी मज दीनाचे अव्हेरण ॥15॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग