वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १०, पाईक अभंग ९३३ ते ९३८

जालोनी पाइके गोवीपण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074726 · अभंग क्र. ९३३

933.
जालोनी पाइके गोवीपण जिंके ।
परी स्वामीया सेवक साचा होय ॥
एक एकेविणे स्वामी सेवकपण ।
मिरविती हे खूण स्वामी जाणे ॥१॥
पाईक काय स्वामी स्वामिया काय पाईक ।
असता एके एक दोन्ही नव्हती ॥धृ॥
स्वामीचे काज पाईकपणे वोज ।
करिसा होय चोज पै गा ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलासी बोळगता ।
पाईका स्वामी असता निवृत्ति ऐसा ॥२॥

अर्थ :
पाईक म्हणजे सेवक होऊन स्वामीपणा प्राप्त करून घेतो. तथापि स्वामी आणि सेवक हा भाव कायम राहतोच. स्वामीपणा किंवा सेवकपणा हे सापेक्ष आहेत. म्हणजे स्वामीपणा असला तरच सेवकपणा असणार, आणि सेवकपणा असेल तरच स्वामीचे स्वामीपण, पण ऐक्य भावाचा निश्चय होऊन देव भक्तांमध्ये स्वामीसेवकपणा कसा नांदत आहे याची खूण देवच जाणतो. लौकिकदृष्ट्या विचार केला तर सेवक काय स्वामी होईल? का स्वामी सेवक होईल? दोघामध्ये ऐक्य निश्चित झाले असता स्वामी सेवकपणा हा द्वैतभाव राहात नाही. धन्याचे काम सेवकपणा पत्करून चांगले केले असता त्याचे कौतुकच होते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना भजले असता पाईक जपाईकपणाने असला तरी माझे मालक निवृत्तीराय आहेत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग