नाम ह अमृत भक्तांसी
816.
नाम ह अमृत भक्तांसी लाधले । आपण घेतले बौध्यरुप ॥१॥
नाम हे आळवा नाम हे आळवा । होईल दोहावा कामधेनु ॥२॥
न बाधेल विघ्न प्रपंच हे भान । नाम हेंचि खूण वैकुंठींची ॥३॥
नामा म्हणे जीव ब्रह्म असे सर्व । हा गीतेमाजी भाव सांगितला ॥४॥
