वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नाही भक्ती नामी चांड

🙏 4. संत नामदेव · ABH-083311 · अभंग क्र. ८१५

815.
नाही भक्ती नामी चांडाळ पातकी । तोचि जाणावा लोकी दुष्ट नष्ट ॥१॥
प्रपंची कर्दमी गढोनिया ठेले । न निघती बोले संताचिया ॥२॥
काढिता त्या वाटे प्रपंचाचे दुःख । विषयाचे सुख हर्ष बहु ॥३॥
पुत्र वित्त कांता मानी भरंवसा । पडे मोह फांसा जन्मवरी ॥४॥
नामदेव म्हणे अंती आहे कोण । कळा नामाविण नानापरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग