दुरवरी वोझे वाहिलासे
1848.
दुरवरी वोझे वाहिलासे भार । आता वेरझार खुंटलीसे ॥१॥
माझिया पै मने मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥
सांपडला मार्ग उत्तमाउत्तम । गेले कर्म धर्म पारुषोनी ॥३॥
एका जनार्दनी पाहता निश्चित । निवारली भ्रांति देहा देव ॥४॥
