(तुकोबांच्या अभंगाती
3483.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
कण भुसाच्या आधारे । परि ते निवडिता बरे ॥१॥
काय घोंगालि पाधाणी । ताकामध्ये घाटी लोणी ॥धृपद॥
सुइणीपुढे चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥
तुका म्हणे ज्ञान । दिमाकाची भणभण ॥३॥
अर्थ :
धान्य हे भूसाच्या आतमध्ये असते परंतू त्या भूसाच्या आतून धान्याचे कण निवडणे हेच चांगले असते. एखादी घांगावलेली मूर्ख स्त्री ताकामध्ये लोणी टाकते आणि ते घोटत बसते परंतू तीला लोणी व ताक यामधील फरक कळत नाही. हे चावट स्त्री सुईनी पुढे लिंग लपवून कसे ठेवता येईल ? तुकाराम महाराज म्हणतात, थोडेसे जरी ज्ञान प्राप्त झाले तरी त्या ज्ञानाचा दिमाख सर्वत्र दाखवीत भणभण करत काही लोक फिरत असतात.
