वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(तुकोबांच्या अभंगाती

🙏 3. संत तुकाराम · ABH-080454 · अभंग क्र. ३४८४

3484.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
विकल तेथे विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥
हा तो निवाड्याचा ठाव । खरा खोटा निवडो भाव ॥धृपद॥
गऱ्हवारे हा विधि । पोट वाढविले चिंधी ॥२॥
लावू जाणे विल्हे । तुका साच आणि कल्हे ॥३॥

अर्थ :
हे दुसऱ्यांचे काव्य चोरणाऱ्या लोकांनो मातीला बुक्का नांव ठेवा आणि जेथे ते विकेल तेथे तुम्ही खुशाल विका. परंतू आमच्या ठिकाणी खोटेपणा चालणार नाही आमच्याजवळ खरे आणि खोटे निवडण्याचे ठिकाणच आहे. एका स्त्रीने पोटाला चिंध्या बांधल्या आणि मी गरोदर आहे असे सर्वांना खोटेच सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, खरे आणि खोटे हे मला चांगलेच समजते आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची हे देखील मी चांगल्या प्रकारे जाणतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग