(तुकोबांच्या अभंगाती
3482.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥
ऐशी अभाग्याची बुद्धि । सत्य लोपी नाही शुद्धि ॥धृपद॥
नाक कापुनि लावी सोने । कोण अळंकार लेणे ॥२॥
तुका म्हणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥
अर्थ :
विष कालवून अमृताचा नाश केला. अशी ही अभाग्याची बुध्दी असते त्याच्या अशा वागण्याने सत्याचा नाश होतो याची त्याला शुध्द राहात नाही. स्वत:चेच नाक कापून घेतले आणि त्या जागी एक सोन्याचा अलंकार लावला तर त्याचा काही उपयोग होणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, विहिर पाडून मदार बांधावी म्हणजे त्याचे थडगे बांधावे असेच व्यर्थ कृत्य या सालू मालूचे आहे.
