वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पांडुरंगे पाहा खादली

🙏 3. संत तुकाराम · ABH-080635 · अभंग क्र. ३२१४

3214.
पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही ॥१॥
आता संतांनी करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथे ॥धृपद॥
कोणाचा अन्याय येथे आहे स्वामी । गर्जतसो आम्ही पातकी ही ॥२॥
याचे पावनपण सोडवाचि तुम्ही । पतितपावन आम्ही आहो खरे ॥३॥
आम्ही तव आहो अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥
तुका म्हणे आम्ही मेलो तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावे ॥५॥

अर्थ :
पाहा पाडूरंग आता रडी आला आहे परंतू आम्ही त्याची नामरुपी शेंडी हातात धरली आहे. आता संतांनीच आमच्या दोघामध्ये पंचायत बोलावून निवाडा करावा आणि आमच्या दोघामध्ये कोण फजितखोर आहे हे ठरवावे. हे संतजनहो येथे अन्याय कोण करीत आहे याचा तुम्ही निवाडा करा मी करतो की माझा स्वामी करतो हे तुम्ही सांगा आम्ही तर गर्जून सांगतो की आम्ही पातकी आहोत. आता तर तुम्ही देवाचे पतितपावन हे ब्रीद त्याच्यापासून वेगळे करा कारण खरे पतितपावन तर आम्हीच आहोत. अहो आम्ही तर सर्वथा अन्यायीच आहोत परंतू या देवाची कथा सर्वत्र प्रसिध्द आहे की हा पतितपावन आहे मग ती कथा खरी कशावरुन ती तुम्ही सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही असेच जरी मेलो तरी चालेल परंतू आम्ही तुमच्या चरणांना सोडणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग