वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

योगिया दुर्लभ तो म्य

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074362 · अभंग क्र. ६६४

664.
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी ।
पाहता पाहता मना न पुरे धणी ॥१॥
देखिला देखिला माये देवांचा देवो ।
फिटला संदेहो निमाले दुजेंपण ॥ २ ॥
अनंतरुपे अनंतवेषे देखिले मी त्यासी ।
बाखरखुमादेवीवरु खूण बाणली कैसी ॥३॥

अर्थ :
योगिजनांना दुर्मिळ असे पांडुरंगाचे दर्शन मला झाले आणि ते किती पाहिले तरीही मनाची तृप्तता होत नाही. हा देवांचा देव विठ्ठल मी पाहिला आणि मनातील सर्व संदेह संपले व मी माझे मन इतके त्याच्या ठिकाणी तद्रूप झाले की काही द्वैत उरले नाही. पांडुरंगाची अनंत वेषातील अनंत रुपे मी पाहिली आणि तल्लीनतेने मनोमन एकात्म रुपाची खुणगाठ पटली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग