(निर्याणाचे अभंग)
3614.
(निर्याणाचे अभंग)
चिन्हे उमटती अंगी । शकुनाजोगी उत्तम ॥१॥
आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणो ॥धृपद॥
उत्कंठित झाले मन । हीच खुण तेथींचि ॥२॥
तुका म्हणे काम वारी । आळस घरी करमेना ॥३॥
अर्थ :
माझे मायबाप मला नेण्यासाठी स्वत: येत आहेत असे शुभशकुन व उत्तम चिन्ह माझ्या अंगी उमटत आहेत. मला माझ्या बापाची आईची आठवण येत आहे त्यामुळे ते स्वत:च मूळ घेऊन येतील. ते स्वत: माझ्याकडे मूळ घेऊन येतील की काय हे मला काही कळत नाही माझे मन इतके उत्कंठीत झाले आहे हीच तर खूण आहे की ते माझ्याकडे येतील म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, मला उदयोगधंदयाविषयी आळस आला आहे घरी सुध्दा करमत नाही म्हणजे हा देखील एक शुभशकुनच आहे.
