वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

माझिया भावाचे खंडण ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088844 · अभंग क्र. ५९४

594.
माझिया भावाचे खंडण ।
नव्हे ऐसे करा दान ।
मुखी नाम तुमचे स्‍मरण ।
राहो चरणावरी दृष्टी ॥१॥
आणखी मी न मागे काही ।
वसो प्रेम तुमच्या ठायी ।
करुनि कृपा आठव देई ।
आवडी कीर्तनी सर्वदा ॥२॥
सुखे भोगीन प्रारब्धठेवा ।
येईल तैसा वोढवोनि देवा ।
मानामान न करी हेवा ।
विसर न पडावा तुमचाची ॥३॥
काय करतील निंदक जन ।
आसना ठायी सावधान ।
तुमचे करिता नित्य चिंतन ।
कैचे बंधन आम्हा दासा ॥४॥
गाईन गुण तुमचे गीती ।
विषय-वासना-दिका शांती ।
तुमच्या पायी जडता प्रीती ।
निळा विनंति करी ऐसी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग