डोळांची पाहा डोळा शू
343.
डोळांची पाहा डोळा शून्याचा शेवट ।
नीळबिंदु नीट लखलखित ॥१॥
विसावो आले पातले चैतन्य तेथे ।
पाहे पा निरूते अनुभवे ॥२॥
पार्वतीलागी आदीनाथे दाविले ।
ज्ञानदेवा फावले निवृत्तिकृपा ॥३॥
अर्थ :
शून्याचा शेवट असलेले डोळ्यांचा डोळा असलेले असे जे निर्गुण स्वरूप त्यांचे योगाभ्यासाने योगी अवलोकन करीत असतांना योग्यांना एक तेजस्वी निळा बिंदु दिसतो. १ त्यात हे चैतन्य ठसावलेले आहे हे अनुभवाने नीट पाहता येते. हेच स्वरूप शकराने पार्वतीला सांगितले. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने मी ही पाहिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
