शुन्याचा शेवट डोळा प
344.
शुन्याचा शेवट डोळा पाहा निराळा ।
नीळबिंदु सांवळा प्रकाशला ॥
ब्रह्म ज्योतिरूप विसावले जेथ ।
अनुभव साद्यंत पहा तुम्ही ॥
ऐसे कैलासनाथे सांगितले पार्वती ।
ज्ञानदेवा निवृत्ति तेचि सांगे ॥॥
अर्थ :
शुन्यरूप जो नीलबिद् त्याचा योगाभ्यासाने अनुभव घ्या. तो तेजोमय आहे त्या ठिकाणी चैतन्यरूप ब्रह्म जणू काय विसावा घेण्याकरिता आले आहे. त्याचा अनुभव घ्या. हेच स्वरूप शंकरानी पार्वतीला सांगितले व निवृत्तिरायांनी कृपा करून मला सांगितले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
