निर्गुणाचे रंगी रंगल
342.
निर्गुणाचे रंगी रंगले हे मन ।
सांवळे सगुण ब्रह्म तेचि ॥
मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती ।
वचनी निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती ॥
असिपदी जैसे तत्पद ते नाही ।
सावळे ब्रह्म पाही तैसे असे ॥
निवृत्तिदास म्हणे चांगया ब्रह्म तेचि खरे ।
सांवळे निर्धारे जाण रया ॥४॥
अर्थ :
जरी माझे मन निर्गुण स्वरूपांत रंगून गेले तरी शामवर्ण सगुण श्रीकृष्णमूर्ति हीच ब्रह्म आहे. सगुण अगर निर्गुण यापैकी एकाचाच अभिमान धरणारे लोक, हे मानणार नाहित खरोखरी सगुण निर्गुण यांची भिन्नता केवळ शब्दमात्र आहे. जसे 'तत्त्वमसि' या महावाक्यांत ‘असि’ पदाहून ‘तत्' हे पद वेगळे आहे. तरी असि' पदाने तत् पदाचे एकत्वच सांगितले आहे. त्याप्रमाणे सांवळे परब्रह्म श्रीकृष्ण व निर्गुण परब्रह्म हे दोन्ही एकच आहे. निवृत्तिनाथ माऊली ज्ञानदेवांना
सांगतात "हे चांगदेवा सगुण व सांवळा श्रीकृष्ण हा खरोखर परब्रह्मच आहे असे तु समज"
