ध्रुवचरित्र - अभंग ३
3431.
ध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३
सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी ॥१॥
भूतांचा मत्सर नाही तेथे द्वेष । चारी धर्म निर्दोष चालताती ॥२॥
प्रजेचे समाधान अपत्याचे परी । ऐसा राज्य करी न्याय नीती ॥३॥
एका जनार्दनी होउनी सावधान । ऐका वर्तमान काय पुढे ॥४॥
