वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

देवे भक्तालागी उपचार

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089783 · अभंग क्र. १९५

195.
देवे भक्तालागी उपचार मांडिले ।
शांति सुखसनी मागे बैसविले ।
धरुनि तन्मयाची छत्रे गौरविले ।
ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले ॥१॥
सुखे राज्य करा म्हणे त्रिमुवनी ।
माझे ऐश्वर्य हे सर्वांगी लेंउनी ।
मिरवा भूषणे ही यश कीर्ति दोन्ही ।
माझी आयुधे ही देतो संतोषोनी वो ॥२॥
शांती विरक्ती हे मूर्तिमंत दया ।
क्षमा नित्यानंदे तुम्हा अर्पिलिया ।
अखंड नैराश्यता सेवे तुमचिया ।
ठेविली निकट वासे नवजती आन ठाया वो ॥३॥
निळा म्हणे ऐसा भक्तांचा समुदाय ।
देवैं आनंदविला प्रीतीच्या उत्साहे ।
म्हणे निर्भय असा जवळीच मी आहे ।
भोगा सुख माझे निजाचे अव्दय वो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग