नित्य श्रीहरीचे आठवि
196.
नित्य श्रीहरीचे आठविते गुण ।
वदनी त्याचिया वो नामाचे स्मरण ।
ह्रदयी धरुनिया निजभावे चरण ।
करीते अनुदिनी हेचि अनुष्ठान वो ॥१॥
येथे आलिये वो याचि निजकार्या ।
केली कर्मे ती अनुदिनी हेचि अनुष्ठान वो ॥२॥
येथे आलिये वो याचि निजकार्या ।
केली कर्मे ती मागील भोगाया ।
आता घडती ती याते समर्पाया ।
नाही भय त्या निजस्थाना जावया वो ॥३॥
वाचे असत्याचा नेदी लागो वारा ।
केले सांडणे वो देह संसारा ।
चित्ती विषयाचा मोडियला थारा ।
नाही गुंतले या दंभ अहंकारा वो ॥४॥
संती सांगितले केले ते जतन ।
नाही आज्ञें त्याचे केले उल्लंघन ।
मतमतांतरा नाही दिल्हे मन ।
ह्रदयी धरिले या हरीचे चिंतन वो ॥५॥
काही ठाकले ते केले लोकहित ।
काया वाचा वो हे वेचुनीया चित्त ।
नाही वंचूनिया ठेविले संचित ।
काळ याचिपरि सारियेला वो ॥६॥
नित्य नवा वो हा आवडीचा दिवस ।
केला करुनिया कीर्तनी उल्हास ।
नाही गोवियेला कोठे आशापाश ।
निळा म्हणे वर्तोनि उदास वो ॥७॥
