वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

हरिरुप ध्यानी हरिनाम

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089214 · अभंग क्र. १०६९

1069.
हरिरुप ध्यानी हरिनाम वदनी ।
हरीच्या चिंतनी तद्रूपता ॥१॥
हरि तया अंतरी हरि तया बाहेरी ।
रक्षी निरंतर श्रीहरी त्या ॥२॥
हरि तया आसनी । हरि तया भोजनी ।
हरि तया शयनी निद्रा करी ॥३॥
निळा म्हणे हरि देह गेह दारा ।
हरी दुजा वारा लागो नेदी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग