हरीचे नामचि एक पुरे
1068.
हरीचे नामचि एक पुरे ।
सकळ साधनाचिये धुरे ॥१॥
पावावया वैकुंठासी ।
लहानथोरा विश्वासीयांसी ॥२॥
न लगे जाणे वनांतरा ।
सोडोनिया घरदारा ॥३॥
निळा म्हणे वैकुंठीपद ।
जावया हे संपदा ॥४॥
1068.
हरीचे नामचि एक पुरे ।
सकळ साधनाचिये धुरे ॥१॥
पावावया वैकुंठासी ।
लहानथोरा विश्वासीयांसी ॥२॥
न लगे जाणे वनांतरा ।
सोडोनिया घरदारा ॥३॥
निळा म्हणे वैकुंठीपद ।
जावया हे संपदा ॥४॥