हाचि उपाव सुगम सार ।
1070.
हाचि उपाव सुगम सार ।
तरणे संसार जया नरा ॥१॥
नाम गाता गोविंदाचे ।
फिटे जीवाचे जीवपण ॥२॥
भुक्ति मुक्ति वोळंगे येती ।
अंगींचि ठाकती दया क्षमा ॥३॥
निळा म्हणे अवघीच सुखे ।
येती हिरखे चोजवित ॥४॥
1070.
हाचि उपाव सुगम सार ।
तरणे संसार जया नरा ॥१॥
नाम गाता गोविंदाचे ।
फिटे जीवाचे जीवपण ॥२॥
भुक्ति मुक्ति वोळंगे येती ।
अंगींचि ठाकती दया क्षमा ॥३॥
निळा म्हणे अवघीच सुखे ।
येती हिरखे चोजवित ॥४॥