येऊनिया घरा बोले राज
3620.
येऊनिया घरा बोले राजाईस । या परिसे सुवर्णासी करी आता ॥१॥
आजाचिये दिन ठेवी आपुले घरी । आपदा ती हरी प्रपंचाची ॥२॥
सरलिया काम देई मजलागी । म्हणोनिया वेगे गृहा आली ॥३॥
एका जनार्दनी झाली ऐसी मात । नामयासी श्रुत केली नाही ॥४॥
