निसगासी संग न लगे आण
1069.
निसगासी संग न लगे आणिकाचा | परमार्थ हा साचा गहन केला ॥१॥
जड या जीवाचे हरविले अज्ञान | नेले उतरून भवसिंधु ॥२॥
ज्ञानियासी केली सिंधु संजीवनी | जाले जनी वनी एक तारू ॥३॥
नामा म्हणे सत्य बा माझ्याचे बोलणे | करी निंबलोण पदी त्यांचे ॥४॥
