फार आठवते निवृत्तीचे
1070.
फार आठवते निवृत्तीचे चित्ती | सोपान स्फुंदती मुक्ताबाई ॥१॥
आम्हा माता पिता नित्या ज्ञानेश्वर | नाही आता थार विश्रांतीसी ॥२॥
छळिले ब्राहमणे प्रतिष्ठानी जाता | रेडयामुखी वेदांता बोलविले ॥३॥
आला चांगदेव व्याघ्र वहान घेऊन | नेला अभिमान ज्ञानदेवे ॥४॥
नाना प्रकारचे आठविती शब्द | नामा म्हणे बोध भाविकाला ॥५॥
